आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरांच्या नावाने गळे काढणाऱ्यांची दातखिळी बसली?:दानवेंची भाजपवर टीका?; अमेरिका, इंग्लंडमध्ये शिवरायांवर अभ्यासक्रम

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका इंग्लंड मधील विद्यापीठांमध्ये शिवाजी महाराजांच्या रन निती न्याय धोरण समाजनीती शेतकऱ्या विषयीचे धोरण यासंदर्भात अमेरिका आणि इंग्लंड मध्ये विद्यापीठात अभ्यासक्रम राबवले जातात. सावरकरांच्या नावाने गळा काढणाऱ्यांचे आता दातखिळी बसली असल्याची टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप वर केली आहे ते औरंगाबाद मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

दानवे म्हणाले की, राज्यातल्या 22 जिल्ह्यात आदित्य ठाकरे आणि आम्ही दौरा केला आहे.​​​​​​ शेतकऱ्यांचे विविध प्रश्न या निमित्ताने मांडले आहेत. शेतकऱ्याना सततच्या पावसाच्या नुकसानीचा निधी मिळाला नाही.

परभणीत कमी दाखवले नुकसान

अंबादास दानवे म्हणाले की, आम्ही नुकताच परभणी जिल्ह्यामध्ये मोठा मोर्चा काढलेला आहे. परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या नुकसानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील पंचनामे कमी झाल्यामुळे परभणी जिल्ह्याचे क्षेत्र कमी दाखवण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना देखील परभणी जिल्ह्यात पिक विम्याची तक्रारी करून देखील शेतकरी अपात्र ठरवले जात आहेत.त्यामुळे आम्ही मोर्चा काढल्या नंतर पिक विमा बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात येत आहे.

कारखान्यासाठी ऊस कुठून आणला

यावेळी दानवे यांनी रोय मंत्री संदिपान भूमरे यांच्यावर देखील टीका केली आहे. भुमरे यांनी कारखान्यासाठी ऊस कुठून आणला याचे उत्तर द्यावे तसेच त्यांच्या बाबत आपल्याकडे पुरावे असून विधान परिषदेत आपण ते मांडणार असल्याचा इशारा देखील दानवे यांनी यावेळी दिला.

सीमावाद प्रश्न प्रकरणात बैठकीत जाणार

दानवे म्हणाले की नीलम गोरे यांची सरकार सोबत झालेली चर्चा ही केवळ अधिवेशनाच्या निमित्ताने झालेली असून त्यात काहीही वावगे नाही तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक संदर्भात सीमा प्रश्नावर होणारे बैठकीमध्ये देखील आपण सहभागी होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. सीमा प्रश्नसंदर्भात आक्रमक भूमिका सत्ताधारी पक्ष घेऊ शकणार नाही. मात्र विरोधी पक्ष नेते म्हणून आपण आक्रमक भूमिका मांडणार असल्याचे दानवे यांनी सांगितले

बातम्या आणखी आहेत...