आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठक:सावता परिषद माळी समाजाचे प्रबोधन करणारी संघटना : मंत्री अतुल सावे

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संघटना समाजाला दिशा देण्याचे काम करतात. राज्यातील माळी समाजाचे प्रबोधन सावता परिषदेच्या माध्यमातून होत आहे, असे मत राज्याचे सहकार व बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केले.सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यात संपर्क अभियान राबवण्यात येत आहे. याअंतर्गत औरंगाबाद येथे सावता परिषदेची बैठक झाली. या वेळी मंत्री अतुल सावे यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी मराठवाडा अध्यक्ष शिवानंद झोरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर, माजी सभापती दिलीप थोरात, प्रदेश महासचिव मयूर वैद्य, प्रदेश प्रवक्ते डॉ. राजीव काळे, गणेश दळवी, रामभाऊ पेरकर, मदनराव नवपुते, शारदाबाई कोथिंबिरे, सदानंद मगर, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव, मंजूषा महाजन, रामदास शेळके आदी मान्यवरांची उपस्थिती होती. साईनाथ जाधव विलास ढगारे, जनार्दन राऊत, जनार्दन कापुरे, अशोक राऊत, माधव खलसे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...