आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर्तास बांधकामाचा आदेश काढण्यास शासनास मनाई:हिमायतबाग वाचवा...आज बैठकीचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नैसर्गिक ऑक्सिजनची बँक आणि चारशे वर्षांपासूनचा जैवविविधतेचा संपन्न वारसा असलेल्या हिमायतबागेच्या संरक्षणासाठी रविवारी, १२ मार्चला सकाळी ८ वाजता बागेतच आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन हिमायतबाग बचाव समिती आणि अंब्रेला वेल्फेअर फाउंडेशनने केले आहे. तीनशे एकरच्या क्षेत्रावरील या बागेतील केवळ ४० एकराचे संवर्धन करून उर्वरित क्षेत्रातील वृक्ष तोडून महिला कृषी महाविद्यालयाचा प्रस्ताव परभणी कृषी विद्यापीठाच्या वतीने तयार करण्यात आला आहे. यामुळे धोक्यात आलेल्या सदर बागेतील जैवविविधतेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने हिमायतबाग बचाव समितीच्या वतीने ही बैठक आयोजित केली आहे.

हिमायतबागेतील जैवविविधतेचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य जैवविविधता समितीच्या वतीने वारसा संवर्धन क्षेत्र म्हणून या परिसरात मान्यता दिली आहे. दरम्यान, परभणी कृषी विद्यापीठाने येथील ३०० एकर क्षेत्राच्या संवर्धनाचा प्रस्ताव नजरचुकीने झाला असून ४० एकर परिसराचे संवर्धन पुरेसे असून उर्वरित जागेवर महिला कृषी महाविद्यालय उभारण्याची भूमिका घेतली आहे. अॅड. संदेश हांगे यांनी खंडपीठात दाखल याचिकेची शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी न्या. रवींद्र घुगे व न्या. संजय देशमुख यांच्या खंडपीठाने या बांधकामासाठी वृक्षतोडीवर प्रश्न उपस्थित करीत तूर्तास बांधकामाचा कोणताही आदेश काढण्यास शासनास मनाई केली आहे. महिला कृषी महाविद्यालयासाठी विद्यापीठाची पर्यायी जागा उपलब्ध असल्याकडेही खंडपीठाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...