आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील एका वृद्धेच्या घरी जाऊन त्यांच्या मुलाचे नाव सांगत “लॉटरी लागली आहे. त्यातील सोने घ्यायला तुम्हाला बोलावले आहे,’ असे सांगून एका ठकसेनाने वृद्धेला सोबत नेऊन तिच्या अंगावरील दोन तोळे सोने लंपास केले. ही घटना मंगळवारी दुपारी गजानननगर ते विजय चौकादरम्यान घडली. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांत शहरात अशा बारापेक्षा अधिक घटना घडूनही स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला यातील एकाही आरोपीला पकडता आलेे नाही.
गजानननगरातील शोभा साहेबराव वाघचौरे (६५) दुपारी एकट्याच घरी होत्या. त्या वेळी सायंकाळी ५ वाजता त्यांच्या घरी एक बुलेटस्वार गेला. तुमचा मुलगा मनोजला टीव्ही, स्कूटी आणि दीड ग्रॅम सोने गिफ्ट लागले आहे. त्यातील सोने घेण्यासाठी मनोजने तुम्हाला घ्यायला पाठवल्याचे सांगितले. मुलाचे नाव घेतल्याने वृद्धेचा विश्वास बसला व त्या त्याच्यासोबत विजयनगर चौकात बुलेटवर बसून गेल्या. मात्र, तिथे गेल्यावर त्यांना गळ्यातील सोने व बोटातील अंगठी असे दोन तोळ्यांचे दागिने काढून देण्यास सांगितले. मिळणाऱ्या सोन्यासोबत वजन करून परत देतो, असे सांगून ते घेतले व पोबारा केला. बराच वेळ होऊनही तो परतला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर त्या घरी पायी परतल्या. याप्रकरणी पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या आदेशावरून रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.