आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज प्रक्रिया:एसबीआय : पीओच्या 1673 जागांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टेट बँक ऑफ इंडियात (एसबीआय) परिवीक्षाधीन अधिकारी पदाच्या (पीओ) १६७३ जागा भरण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरला एसबीआयने यासंदर्भात संकेतस्थळावर अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार १२ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. पूर्व परीक्षा शंभर गुणांची, मुख्य परीक्षा अडीचशे, तर तोंडी मुलाखतीत पन्नास गुण आहेत. यात मेरिटनुसार योग्य उमेदवारांची निवड केली जाईल. sbi.co.in या संकेतस्थळावर सिलॅबस आहे.

१६७३ जागांपैकी सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वाधिक ६४८ जागा आहे. त्याखालोखाल इतर मागास वर्गासाठी ४६४ जागा राखीव आहेत. अनुसूचित जातीसाठी २७०, तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या उमेदवारांना १६० जागा राखीव आहेत. अनुसूचित जमातीच्या १३१ उमेदवारांना प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेतील समकक्ष अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. अर्ज करताना पदवीचे अंतिम सत्र असले तरी चालणार आहे. पण मुलाखतीच्या तारखेपर्यंत पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

पात्रतेच्या अटी-शर्थी
उमेदवाराचे वय २१ ते ३० असावे. सर्वसाधारण प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास आणि ओबीसींना ७५० रुपये नोंदणी शुल्क लागेल. १७ ते २० डिसेंबरदरम्यान पूर्व परीक्षा घेतली जाईल. डिसेंबर किंवा जानेवारीत लेखी परीक्षेचा निकाल लागेल. त्यानंतर पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्य परीक्षा होईल. या परीक्षेचा निकाल फेब्रुवारीतच जाहीर केला जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी मार्च-२०२३ दरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...