आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:अनुसूचित जातीचे विद्यार्थी शिष्यवृत्तीला मुकणार, महाडीबीटीने 15 फेब्रुवारीला संकेतस्थळ केले बंद

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज भरण्याचे संकेतस्थळ महाडीबीटीने १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२ नंतर बंद केले. त्यामुळे आधार लिंक, बँक अकाउंटच्या त्रुटीमुळे अर्जच सबमिट होत नाहीत. परिणामी शिष्यवृत्तीचे अर्ज विद्यार्थ्यांच्या लॉगिनलाच पडून असल्याने यंदा अनुसूचित जातीचे हजारो विद्यार्थी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीला मुकणार आहेत. एकूण ७ लाख २३ हजार ९५८ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पाेर्टलवर ऑनलाइन अर्ज भरले आहेत. परंतु १५ फेब्रुवारी ही नवीन व नूतनीकरण शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे महाडीबीटीने संकेतस्थळच बंद केले.

दरम्यान, शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात यावी, यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडे १६ फेब्रुवारी रोजीच पत्राद्वारे मागणी केली आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक आयुक्त जलील शेख यांनी दिली.

१६ फेब्रुवारीपर्यंतची स्थिती
विद्यार्थ्यांच्या लॉगिनलाच पडून अर्ज : १७,४६०
महाविद्यालय स्तरावर पडून : १,८०,७७५
महाविद्यालय स्तरावर अप्रूव्हड : १,१४,९४७
जिल्हा स्तरावर पडून अर्ज : १६,०३९
जिल्हा स्तरावर अप्रूव्हड : ९८,९०८

बातम्या आणखी आहेत...