आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीचे अर्ज:साडेसात हजार विद्यार्थ्यांनी भरले शिष्यवृत्तीचे अर्ज; विद्यार्थ्यांना 31 मेपर्यंत करता येणार अर्ज

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी शासनाकडून शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या शैक्षणिक वर्षांसाठी ७ हजार ९५७ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले आहेत. २०२१-२२ या वर्षीच्या अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

कोरोनाकाळातही २०२०-२०२१ या वर्षी ६ हजार ६६२ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांसाठी ३ कोटी १३ लाख ५० हजार ८२७ रुपये, तर १८ कोटी ६१ लाख ५४ हजार २९९ रुपयांचा निधी महाविद्यालयाच्या खात्यात असा एकूण २१ कोटी ७५ लाख ५ हजार १२५ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता.

मंजूर निधीतून पहिला शिष्यवृत्तीचा हप्ता म्हणून ६ हजार ६५२ विद्यार्थ्यांच्या खात्यात १० कोटी १७ लाख ७९ हजार ३४९ रुपये, तर ५ हजार १२६ विद्यार्थ्यांच्या खात्यात ९ कोटी ३१ लाख २६ हजार १७३ रुपयांची दुसऱ्या हप्त्याची रक्कम टाकण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...