आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ३१ जुलै रोजी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेण्यात आली होती. या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवारी परिषदेच्या https://www.mscepune.in व https://www.२०२२.mscepuppss.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.
जिल्ह्यातून एकूण २०४६ शाळांमधील १७,५९७ पाचवीच्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात खुला, अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीय अशी एकूण ८,५१६ मुले, तर ८,९९९ मुलींनी नोंदणी केली होती. आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी १५,०८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात मुले ७० ७२, तर मुली ७,८८९ हाेत्या. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यावयाची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये ७ ते १७ नोव्हेंबरदरम्यान ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम भरणे आवश्यक आहे. दुरुस्तीसाठी १७ नोव्हेंबरची मुदत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.