आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व किक बॉक्सिंग संघटनेतर्फे आयोजित आंतरशालेय शहरी किक बॉक्सिंग स्पर्धेत काजोल बताडे, श्रेया कुलकर्णी, हर्ष जाधव, प्रज्ज्वल सिंग, सृष्टी अकोलकर यांनी आपापल्या गटात शानदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत 200 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
विजेत्या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेचे उद्घाटन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनपा क्रीडा अधिकारी संजीव बालय्या, जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश मिरकर, राज्य संघटनेचे उपाध्यक्ष अनिल मिरकर यांची उपस्थिती होती. या स्पर्धेत पंच म्हणून सुमित जाधव, प्रथमेश राजपूत, ऐश्वर्या जगताप, दीपाली जाधव, विश्वदिप गिरे, समीक्षा मांजरमे, नरेंद्र सनानसे, रेखा मिरकर, मुस्कान खान आदींनी काम पाहिले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
19 वर्षाखाली मुली
श्रेया कुलकर्णी, 2. दिशा बविक, कुमकुम चौधरी. मुले - आर्यन पंडित, कुणाल कदम, दिनेश लोखंडे, दलाल जोहेब, तुषार सोनवणे, व्यंकटेश भागानागरे, पार्थ पवार, योगेश लोखंडे, साहस नळकांडे, नागराज हिवाळे, दत्तात्रय शिंदे, सुमित नागरे, ओम सदारिया, अमित दाभाडे.
17 वर्षाखाली मुली
खान लाईबा, नयन राठोड, खान सनोवर, ईशा गरजे, अंजनी काकडे, काजोल बताडे, तन्वी जोबले, अश्मीरा पीस, रिया तांबुस, सृष्टी अकोलकर, चंद्रमुखी सुरडकर, जोहा अली, प्रणिता चव्हाण, श्रुती सोनवणे, अश्विनी पाडळे, दिया मनोत, ऋतुजा मोरे, स्वराली कहाते. मुले - अनिरुद्ध पंडित, अर्थव गुप्ते, प्रज्वल सिंग, अमर शेख, विराज भालेकर.
14 वर्षाखालील मुले
हर्ष जाधव, शिवम राजरवाल, कार्तिक भावसार, विजय राठोड, प्रेयस भानुसे, निशांत साळवे, मानस मुठे, हर्षल चव्हाण, प्रथमेश पंडित, वेदांत जीव, विराज राठोड, आर्यन शिरसाठ, सौम्य तांदळे, अंशुमन वाहूळ. मुली - मोनिका देविदास हिरडे, स्नेहल चौधरी, भक्ती वरकसे, दिशा सोनार, तेजश्री खरगे, कल्याणी भराटे, भूमी अग्रवाल, अनुष्का येवले, प्राची मगरे, केतकी जाधव, सिद्धी माधववाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.