आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शाळा भरवणे आले अंगलट; कन्नड तालुक्यातील पिशोर केंद्रातील प्रकार

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक

देशभरात कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात येवू नये, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. असे असताना कन्नड तालुक्यातील पिशोर केंद्रातील शिववस्ती येथील प्रा. शाळेत विद्यार्थ्यांनाच शाळेत बोलावून शिक्षण देणे सुरु केले होते. मात्र, परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत केंद्रप्रमुखांनी मुलांना सुट्टी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

कोरोच्या काळात मुलांना शाळेत बोलवून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जात होता. मुलांना कोरोनाचे गांभीर्य माहित नाही, मात्र, शिक्षकांना कोरोना संसर्गाबद्दल माहिती आहे. कोरोनामुळे राज्यभरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहे. शाळा सुरु करु नये, असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. असे असताना कन्नड तालुक्यातील शिववस्ती शाळेत मंगळवार दि. २५ ऑगस्ट रोजी मुलांनाच शाळेत बोलवण्यात आले होते. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये समुपदेश करण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून भरवलेल्या या शाळेत बहुतांश मुलांनी मास्क लावले नव्हते. याबाबत शाळेच्या शिक्षकास विचारले असता त्यांनी सांगीतले की, ज्या विद्यार्थांकडे मोबाईल नाही, ऑनलाईन शिक्षणापासून दूर आहेत, अशा विद्यार्थ्यांनी शाळेत बोलवले होते. पण केंद्रप्रमुखांच्या सूचनेनंतर लगेच मुलांना सुट्टी देण्यात आली.

गांभीर्य लक्षात घेवून दिली सुटी

मुलांना शिक्षकाने फिजिकल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करुन शाळेत बसलेले होते. मात्र, परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने मुलांना शाळेच्या बाहेर जाण्यास सांगितले. शासनाच्या निर्देशानुसारच शाळा सुरु होणार असल्याचे मुलांना सांगण्यात आले.
- सुर्यभान दवंगे केंद्र प्रमुख

शासनाचे आदेश नाहीत

शाळा सुरु करण्याबाबत शासनाचे अद्याप कोणतेही आदेश नाहीत, मात्र, शासनाचे आदेश नसताना पिशोर केंद्रातील शिववस्तीची जि.प. शाळा भरवली असेल, तर कारवाई करण्यात येईल. याबाबत पिशोर केंद्राच्या केंद्रप्रमुखाकडून खुलासा मागवला आहे. - सुरजप्रसाद जयस्वाल प्राथमिक शिक्षणाधिकारी