आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • School Start Aurangabad | 1 Th Standard To 4 Th Standard School Start In Aurangabad Monday | The Children Said I Got Bored Of Online, I Got Better, The School Opened

पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू:मुले म्हणाली- ऑनलाइनचा कंटाळा आला होता, बरे झाले शाळा उघडली

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्याच दिवशी 35 ते 40 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती

शहरातील बालवाडीसह पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. दोन वर्षांनंतर शाळा भरत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून आला. मुले म्हणाली, ‘ऑनलाइन शिक्षणाचा आम्हाला कंटाळा आला हाेता. बरे झाले आता शाळा उघडली.’ दुसरीकडे वाहतूक व्यवस्थेचा घोळ, पालकांच्या संभ्रमामुळे पहिल्या दिवशी ३५ ते ४० टक्के मुलांची उपस्थिती हाेती.

२० डिसेंबरपासून प्राथमिकचे वर्ग सुरू झाले हाेते. परंतु दहा दिवसांतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा बंद करण्यात आल्या. आता रुग्णसंख्या कमी झाल्याने शाळा सुरू झाल्या आहेत. ज्ञानप्रकाश विद्या मंदिरचे शिक्षक प्रदीप विखे म्हणाले, पहिली ते चौथीच्या वर्गात एकूण ४९० विद्यार्थी आहेत. त्यापैकी २२८ उपस्थित होते.

मुकुल मंदिर शाळेत ९३९ पैकी ४४१ उपस्थित, रेजिमेंटल हिंदी शाळेत १५६ पैकी ४२, रेजिमेंटल इंग्लिश मीडियम शाळेत १६४ पैकी ४७, तर विनायकराव पाटील प्राथमिक शाळेत २०४ पैकी १०६ विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी गैरसोय होत असल्याने संख्या कमी दिसतेय. परंतु नियमित शाळा सुरू राहिल्यास उपस्थिती वाढेल, असे स.भु. शाळेच्या मुख्याध्यापिका परिमिता साने यांनी सांगितले. शाळेनेही सुरक्षेची काळजी घ्यावी, असे पालक पूजा चव्हाण म्हणाल्या.

मी पहिल्यांदाच शाळेत आले : पहिलीची विद्यार्थिनी वैष्णवी चव्हाण म्हणाली, मी पहिल्यांदाच शाळेत आले. मला ऑनलाइनचा कंटाळा आला हाेता. तर चौथीची विद्यार्थिनी आनंदी बनकर म्हणाली, मैत्रिणी भेटत नव्हत्या. आता शाळा सुरू झाल्याने मी खुश आहे.

एक दिवसाआड बाेलावून मनाेरंजनातून शिक्षण
विद्यार्थी शाळेत येण्यासाठी उत्सुक आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एक दिवसाआड विद्यार्थ्यांना बोलावण्यात येत आहे. शिवाय त्यांना कंटाळवाणे वाटू नये म्हणून मनोरंजनातून शिक्षणावर भर दिला जात आहे. - सुरेश परदेशी, मुख्याध्यापक, मुकुल मंदिर शाळा

बातम्या आणखी आहेत...