आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने आयोजित आंतर शालेय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गुरुकुल ऑलिम्पियाड स्कूलच्या संघाने शानदार कामगिरी करत विजेतेपदाला गवसणी घातली. युनिव्हर्सल स्कूल संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बळीराम पाटील हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत 40 शाळेच्या संघानी सहभाग नोंदवला होता. विजेता गुरुकुल ऑलिम्पियाडचा संघ विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत संघ औरंगाबाद शहरचे प्रतिनिधित्व करणार आहे. संघातील विजेत्या खेळाडूंचे शाळेचे प्राचार्य डॉ. सतिश तांबट, मेंटोर गणेश साळुंखे, मुख्याध्यापक पूजा मॅडम, मुख्याध्यापक कविता, समन्वयक रेशू यांच्यासह सर्व शिक्षक वर्गाने अभिनंदन करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. 'विभागीय स्पर्धेत गुरुकुलचा संघ नक्की विजेतेपद जिंकेल. खेळाडूंना शाळेकडून सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे प्राचार्य डॉ. सतिश तांबट यांनी सांगितले.'
अनिकेत, वरदची चमकदार कामगिरी
मुलांच्या 17 वर्षाखालील गटात अंतिम लढत अतिशय रंगतदार व चुरशीची पहायला मिळाली. या सामन्यात गुरुकुलने पहिला सेट जिंकून बढत घेतली होती. मात्र त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये युनिव्हर्सल स्कूलने उत्कृष्ट लढत देत सामन्यात पुनरागमन करत सेट आपल्या नावे करत सामन्यात बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या व अखेरच्या निर्णायक सेटमध्ये अनिकेत देवकाते व वरद वैरागढ यांची उत्कृष्ट सर्व्हिस आणि इतर खेळाडूंनी दाखवलेल्या सांघिक खेळाच्या जोरावर गुरुकुल ऑलिम्पियाडने सामना 2-1 अशा सेटने जिंकून सुवर्णपदक आपल्या खात्यात जमा केले. गुरुकुलला क्रीडा विभाग प्रमुख अविनाश व व्हॉलीबॉल प्रशिक्षक अभिषेक गणोरकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
गुरुकुलचा विजेता संघ पुढीलप्रमाणे
देवाशिष राऊत, उमर सय्यद, अद्ववैत क्षीरसागर, वरद वैराळकर, आयुष्य कस्तुरे, श्रीकर कोमूळवार, तनिष्क संकलचा, संस्कार परदेशी, तन्मय भारंबे, मनोविजय गायकवाड आणि अथर्व मुंडे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.