आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री देसाईंचे आदेश:शाळा, कॉलेजचे 50% पाणी कपात करून 20 हजार नागरिकांना पुरवणार; बल्क युजर्सच्या पाणीपुरवठ्यात 15 जूनपर्यंत कपात

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी मनपा प्रशासन आता कामाला लागले आहे. ४१ कलमांवर मनपाकडून काम सुरू आहे. त्यात हर्सूल तलावातून वाढीव पाणी उपसा वाढवणे, एमआयडीसीचे पाणी घेणे, गळती थांबवणे आदींचा समावेश आहे.

त्यात आता ‘बल्क युजर्स’च्या म्हणजे विद्यापीठ, शाळा, कॉलेज आणि कंपन्यांच्या पाणीपुरवठ्यात १५ जूनपर्यंत कपात करण्याचे ठरले आहे. शुक्रवारी (१३ मे) पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय झाला आहे.

यातून दीड एमएलडी पाणी वाचेल. ते सुमारे २० हजार लोकांना पुरवता येईल, असा मनपा पाणीपुरवठा विभागाचा अंदाज आहे. पुढील चार दिवसांत ही कार्यवाही होईल, असे पालकमंत्र्यांना या बैठकीत सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...