आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:शाळांना दैनिक अहवाल भरणे अनिवार्य, ऑनलाईन स्वरुपात भरावा लागणार अहवाल

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिक्षण विभागाने सदर माहिती भरण्यासाठी विशेष लिंक तयार केली आहे.

कोरोनामुळे शैक्षणिक सत्र विस्कळीत झाले आहे. यातच 23 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा दैनिक अहवाल शाळांना ऑनलाईन स्वरुपात भरावा लागणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष लिंक तयार करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील किती शाळा, कनिष्ठ महाविद्यालये प्रत्यक्ष सुरु झाली. ग्रामीण भागातील किती शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी कोरोना टेस्ट केली, त्यापैकी किती पॉझिटीव्ह व किती निगेटीव्ह आले. याची माहिती दररोज शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे.

शिक्षण विभागाने सदर माहिती भरण्यासाठी विशेष लिंक तयार केली आहे. जिल्ह्यातील शाळांनी दररोज 'दैनिक शाळा अहवाल" ऑनलाइन भरणे बंधनकारक करण्यात आले आहे. दररोज दुपारी एक वाजेपर्यंत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन माहिती भरावी लागणार आहे. या ऑनलाइन माहितीत शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, शाळेचा युडायस क्रमांक, विद्यार्थी पटसंख्या, शिक्षक संख्येसह किती पॉझिटिव्ह व निगेटिव्ह यासह शालेय मुलांची थर्मल गन, ऑक्सिमीटरसह तपासणी केली का? विद्यार्थ्यासाठी हात धुणे, शाळा निर्जंतुकीकरण केले का? आदी विविध माहिती दररोज भरावी लागणार आहे.

जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयासह जिल्हा परीषदेच्या शाळांना देखील माहिती भरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे किती शिक्षक पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह आहेत यांची निश्चित संख्या, तसेच दररोज किती विद्यार्थी उपस्थित आहेत याची दैनंदिन माहिती शिक्षण विभागाला मिळत आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser