आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवडते मज अफाट शाळा:औरंगाबादमध्ये ढोल वाजवत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत; वर्गाच्या दारात डोरेमॉनची रांगोळी

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चिमुकल्यांचा किलबिलाट आजपासून ऐकायला मिळणार आहे.

राज्यातील बहुतांश शाळांमध्ये सोमवारी, 13 जूनपासून चिमुकल्यांची लगबग पाहायला मिळाली. सुट्यांनंतर चिमुकली मुले परतल्याने शाळांचे परिसर मुलांसह पालकांच्या गर्दीने फुलल्याचे पाहायला मिळाले. त्यात शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद आणि कुतूहलही पाहायला मिळाले. शाळांनीही अत्यंत जल्लोषात, ढोल वाजवून चिमुकल्यांचे स्वागत केले.

कुठे डोरेमॉनची सुंदर रांगोळी, तर प्रवेशद्वारावर सुंदर फुग्यांची सजावट, वेलकमचा बॅनर, सेल्फी पॉइंट अशा अनेक प्रकारे शाळांनी मुलांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.

शाळेतील शिक्षकांनी चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत केले. या चिमुकल्यांनीदेखील आनंदाने शाळेत प्रवेश केला. कुणी सायकलवरुन तर कुणी पालकांसोबत शाळेत पोहोचले.

शाळेतील शिक्षकांसोबत विद्यार्थी
शाळेतील शिक्षकांसोबत विद्यार्थी

खरं तर कोरोनामुळे आतापर्यंत अनेकांनी ऑनलाइन शाळाच बघितली होती. मात्र, आता मुलांची ऑफलाइन शाळा सुरू झाली आहे. शाळा कशी असते हे माहित नसल्याने या चिमुकल्यांचा वेगळा उत्साह पाहायला मिळाला.

बातम्या आणखी आहेत...