आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामान्य विद्यार्थ्यांमध्ये असमान्य प्रतिभा शोधण्यासाठी ९४.३ माय एफएमच्या वतीने “ब्रेन्स आॅफ औरंगाबाद’ ही टॅलेंट हंट परीक्षा घेतली जाणार आहे. या बौद्धिक परीक्षेत पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्याच चालू अभ्यासक्रमावर आधारित गणित, विज्ञान व सामान्य ज्ञान या विषयांवर एक अनोखी अॅप्टिट्यूड टेस्ट होणार आहे. प्रत्येक शाळेत माय एफएमची टीम परीक्षा घेण्यासाठी ५ ते २५ जानेवारीदरम्यान येणार आहेत.
ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर (डीएफसी), एमकेसीएल, एल.जी इलेक्ट्रोनिक्स, ग्रीन सेन्स सोलार एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल अकॅडमी, साई न्यूरोसिटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल “ब्रेन्स ऑफ औरंगाबाद’चे सहप्रायोजक आहेत. तर बीझ टाॅवर, चिकलठाणा हे व्हेन्यू पार्टनर आहेत. या चाचणी परीक्षेत एकूण ३० प्रश्न आहेत. त्यासाठी ३० मिनिटांचा वेळ आणि ३० गुण ठेवले आहेत. ही परीक्षा औरंगाबादच्या विविध १५ शाळांत घेण्यात येणार आहे. यात पाचवी ते दहावीचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. “ब्रेन्स ऑफ औरंगाबाद’मध्ये आपल्या शाळेचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी शाळेचे नाव आणि BOA टाइप करून ८५५०९४३९४३ या क्रमांकावर व्हाॅटस्अॅपवर पाठवावे.
९६ बक्षिसे दिली जाणार बीझ टाॅवर, धूत हॉस्पिटलच्या पाठीमागे, चिकलठाणा एमआयडीसी येथे ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत स्पर्धेचा अंतिम निकाल व विद्यार्थी, पालकांसाठी उपयुक्त असा करिअर गाइडन्स तसेच स्कूल एज्युकेशन पाॅलिसी सेमिनार हाेणार आहे. यात प्रत्येक शाळेतील, प्रत्येक वर्गातील, सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्याला आणि सर्व १५ शाळांमधून सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्या प्रत्येक वर्गातल्या विद्यार्थ्यांना एकूण ९६ बक्षिसे देण्यात येणार आहेत. याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ऐकत राहा ९४.३ माय एफएम.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.