आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनात शाळा:राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तरी अनेक ठिकाणी तूर्तास बंदच, जाणून घ्या कुठे सुरू आणि कुठे बंद!

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील शाळेत 9 वी ते 11 वी च्या विद्यार्थ्यांची 30 टक्के उपस्थिती होती - Divya Marathi
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील शाळेत 9 वी ते 11 वी च्या विद्यार्थ्यांची 30 टक्के उपस्थिती होती
  • कोविड निगेटिव्ह रिपोर्ट आल्याशिवाय शिक्षकांना प्रवेश नाही; विद्यार्थ्यांनाही पालकांच्या हमीपत्रानंतरच प्रवेश

राज्यात मागील 8 महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील काही ठिकाणच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील शाळा सुरू करण्याचा आदेश असला तरीही कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहून तेथील शाळा उघडण्याबाबतचा निर्णय सरकारने जिल्हा प्रशासनावर सोपवला होता. त्यामुळे अनेक ठिकाणाच्या शाळा अद्यापही बंदच आहेत.

विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

औरंगाबाद शहर वगळता ग्रामीण भागातील शाळा सुरू

औरंगाबाद शहर वगळता जिल्ह्यातील ग्रामीण भागात 824 शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहेत. तत्पूर्वी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी व इतर तयारी करण्यात आली होती. ज्या शिक्षकांची चाचणी झाली त्यांनाच शाळेत प्रवेश दिला जाईल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी दिली. रविवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यातील १३ शिक्षक आणि २ कर्मचारी असे एकूण १५ जण पॉझिटिव्ह आढळून आले. औरंगाबाद शहरातील शाळा मात्र ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार असून, फक्त आॅनलाइन शिक्षण सुरू राहिल.

मुंबईतील शाळा थेट पुढच्या वर्षीच उघडणार

दिवाळीनंतर कोरोनाचा पुन्हा उद्रेक पुन्हा झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा सुरू होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले होते.

पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच

पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महापालिका आणि खासगी शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी अलिकडेच सांगितले होते. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी कोरोना संसर्गाची स्थानिक परिस्थिती पाहून तेथील शाळा उघडण्याबाबतचा निर्णय प्रशासनाने जिल्हा प्रशासनावर सोपवला होता.

नाशकातील शाळा 4 डिसेंबरपर्यंत राहणार बंद

राज्यातील इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही तूर्तास शाळा सुरू होणार नाही. 4 जानेवारीपासून नाशिकमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या एका बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

जळगावमधील शाळांबाबत आज होणार निर्णय

जळगावमध्ये सध्याच्या परिस्थितीत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत सातशे शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. त्यामुळे शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे जळगावमधील शाळा सुरू करण्याचा निर्णय आज घेण्यात येणार आहे

कोल्हापुरात आजपासून शाळा सुरू नाही

कोल्हापुरातही उद्या शाळा सुरू होणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्याने उद्यापासून शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार असल्याचं कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितलं.

नागपूर मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद

नागपूरमध्येही 25 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रविवारी आढावा बैठक घेतली होता. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूरमध्ये 41 शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे 23 आणि 24 तारखेला कोरोनाच्या स्थितीचा पुन्हा आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. तसेच मनपा हद्दीतील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser