आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाळा शुल्क:शाळांनी शुल्क वसुलीची सक्ती करु नये, राज्य शासनाच्या सर्व शाळांना सूचना

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे

लॉकडाऊन असल्याने शाळा बंद आहेत, मात्र शाळांकडून सक्तीने शुल्क वसुली केली जात असल्याचे प्रकार सुरु होते. शासनाने ही गोष्ट विचारात घेत सर्व बोर्डाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी २०१९-२० आणि २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील शालेय शुल्क वसुलीची सक्ती करु नये, असे आदेश देणारे परिपत्रक जारी केले आहे. या पत्रकामुळे अडचणीत सापडेल्या पालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

यावर्षी शैक्षणिक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी कोरोनाचा प्रादुर्भावामुळे १५ मार्चपासून शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयानंतर राज्यातील मराठी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या परीक्षा न घेता सुट्या देण्यात आल्या. अशा स्थितीमध्ये उर्वरित शिल्लक राहिलेले शुल्क भरावे, असे फोन पालकांना शाळेकडून केले जात होते. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शुल्क न आकारण्याचे आदेश शासनाने दिले होते. मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवीत या शाळांकडून पालकांना सध्या शुक्ल भरण्यासाठी तगादा लावण्यात आला होता.

दरम्यान, शासनाने आदेश काढून महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी संचारबंदी संपून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये, असे निर्देश केंद्र सरकारनं जारी केले आहेत. त्याचवेळी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागानेही एक परिपत्रक काढून हे शुल्क भरण्यास एक वर्षाची मुदत वाढ दिली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक अडचणींना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्ष आणि आगामी शैक्षणिक वर्षाची फीस जमा करण्याचा कालावधी वाढवून द्यावा, अशी मागणी अनेक पालकांनी राज्य सरकारकडे केली होती. त्या पार्श्वभमीवर राज्य सरकारने आज हे परिपत्रक जारी केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये कोणत्याही शाळेने चालू आणि आगामी शैक्षणिक वर्षाचे फीस जमा करण्याची सक्ती पालकांना करू नये, असेही परिपत्रकात म्हटले आहे

बातम्या आणखी आहेत...