आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सीबीएसई संलग्नीकरण:शाळांना मोजावे लागणार दोन लाख रुपयांचे शुल्क, नूतनीकरणासाठी मोजावे लागणार दीड लाख रुपये

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐन लॉकडाऊनच्या काळातच हा निर्णय झाल्याने शाळा संतप्त झाल्या आहेत
Advertisement
Advertisement

सीबीएसई, सीआयएससीई, आयबी, आयजीसीएसई, सीआयई मंडळांशी संलग्नित होण्यासाठी शाळांना राज्याच्या शालेय शिक्षण खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) लागते. दर पाच वर्षांनी त्याचे नूतनीकरणही करावे लागते. आजवर ही प्रमाणपत्रे विनामूल्य मिळायची. आता सीबीएसई तसेच इतर मंडळांच्या शाळांना संलग्नीकरणासाठी दोन लाख रुपये शुल्क भरावे लागणार आहे. नूतनीकरणासाठीही दीड लाख रुपये मोजावे लागतील. याबाबत महाराष्ट्र सरकारने जीआर काढला आहे. ऐन लॉकडाऊनच्या काळातच हा निर्णय झाल्याने शाळा संतप्त झाल्या आहेत.

विनामूल्य ते २.५ लाख

> संलग्नीकरण व नूतनीकरणाच्या एनओसीसाठी शाळा जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांंमार्फत (प्राथमिक) किंवा मंत्रालयात प्रस्ताव देतात.

> २० जुलैच्या जीआरनुसार नवीन शाळेला वेगवेगळ्या बोर्डांशी संलग्नीकरणाच्या एनओसीसाठी अडीच लाख रुपये मोजावे लागतील.

> याप्रमाणेच दर ५ वर्षांनी एनओसीच्या नूतनीकरणासाठी दीड लाख रुपये आकारलेे जातील.

> शाळांना सीबीएसईकडेही संलग्नीकरण शुल्क भरावे लागते. कोरोनामुळे त्यास ६ महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, राज्याने आदेश काढल्यापासूनच नवीन शुल्क लागू केले आहे.

हे शुल्क अनावश्यक

आतापर्यंत विनामूल्य मिळणाऱ्या एनओसीसाठी पहिल्यांदाच हे शुल्क लागू केले आहेे. ते लाखोंच्या घरात आहे. कोरोनाच्या काळात तर ते लागू करण्याची गरज नव्हती. - नागेश जोशी, सचिव, ज्ञानदा इंग्लिश स्कूल, औरंगाबाद.

जाचक निर्णय

कोरोनाकाळात पालकांकडून फीस घेऊ नका असे सरकार सांगत आहे. शाळांकडून मात्र एनआेसीसाठी लाखो रुपये शुल्क आकारत आहे. शाळांसाठी हे शुल्क जाचक आहे. - अमित भोसेकर, संचालक, पीएसबीए इंग्लिश स्कूल, औरंगाबाद

Advertisement
0