आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआता शाळांमध्ये प्रत्येक शनिवार हा 'वाचू आनंदे' असा असणार आहे. म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकच नव्हे तर विद्यार्थी मित्र त्यांच्या आवडीची आवांतर पुस्तके देखील वाचू शकतील. त्यासाठी खास समग्र शिक्षा अंतर्गत शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसे आदेशही सर्व शाळांमध्ये देण्यात आले आहेत. अशी माहिती प्रादेशिक विद्या प्राधिकरण येथील अधिकाऱ्यांनी दिली.
गेल्या दोन वर्षात कोरोना काळात शाळा नियिमित सुरू राहिली नाही. त्यामुळे मुलांच्या अध्ययन क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. विशेषत: प्राथमिक वर्गात शिकणारी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता कमी झाल्याचे आढळून आले आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये तर अक्षर ओळख, मोठी वाक्य, उतारा वाचन विसरल्याचे दिसून आले आहे. यामुळे मुलांमध्ये पुन्हा सर्व संकल्पना स्पष्ट व्हाव्यात. त्यांचा पाया पक्का व्हावा. या हेतूने मुलांमध्ये पुन्हा गोडी निर्माण व्हावी. यासाठी केवळ पाठ्यपुस्तकतच नव्हते तर त्यांना वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी शाळेतील प्रत्येक शनिवारी एक तास हा 'वाचू आनंदे' असा घेत मुलांकडून वाचन करुन घ्यावे त्यांना पाठ्यपुस्तकच नव्हे तर त्यांच्या आवडीचे पुस्तके उपलब्ध करुन देत हा उपक्रम राबविण्यात यावा. असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
सर्वच भाषांचा समावेश
सर्वेक्षणा दरम्यान मुलांमध्ये वाचन किमी झाले आहे तर प्राथमिक वर्गातील विद्यार्थी विसरले देखील असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळांमध्ये 'वाचू आनंदे' हा शनिवारी उपक्रम राबवावा आणि यात मुलांना आवडतील अशा पुस्तकांचे वाचन करुन घ्यावे. ही जबाबदारी त्या त्या भाषा विषयाच्या शिक्षकांची असेल. ज्यात मराठीसह इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू आदी भाषा विषयांचा समावेश असावा असे सांगण्यात आले आहे.याबरोबर आवश्यकतेनुसार मुलांना कोणत्या शब्दाचा उच्चार कसा असावा यासाठी ऑडिओ, व्हिडिओचाही वापर शाळा करु शकतात.- डॉ. कलिमोद्दीन शेख, संचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.