आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलागुणांन:शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : अॅड. शेरखाने

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अगस्त्या इंटरनॅशनल व बाळासाहेब पवार फाउंडेशनतर्फे विद्यादीप बालगृहात पाचदिवसीय हिवाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अॅड. आशा कटके शेरखाने यांच्या हस्ते झाले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कलागुण शिकणे गरजेचे आहे.

हिवाळी शिबिराच्या माध्यमातून खेळीमेळीच्या वातावरणात शिकण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व आत्मविश्वास वाढेल, असे मत अॅड. शेरखाने यांनी व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रूपेश मोरे, विजय देशमुख, गजानन सूर्यवंशी, डॉ. जगदीश टाकळकर, दिलीप बठाई, वैभव घुले, नागोराव साळवे, महेश करखुले, प्रवीण राठोड आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...