आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराेग्य:‘माता सुरक्षित’ मोहिमेत दोन लाख महिलांची तपासणी ; 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार मोहीम

औरंगाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात नवरात्रोत्सवापासून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही मोहीम सुरू आहे. आतापर्यंत २ लाख १८ हजार ७१४ महिलांची तपासणी करण्यात आली आहे. ही मोहीम १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून यात महिलांची आराेग्य तपासणी मोफत केली जात आहे.

शहरात २६ ऑक्टोबर रोजी माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेची सुरुवात झाली होती. या अंतर्गत जागोजागी तपासणी शिबिर घेतले जात आहे. यात मेडिसिन तज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, नेत्र तपासणी, अस्थिरोगतज्ज्ञ आदी डॉक्टरांकडून तपासण्या केल्या जात आहेत. तसेच मॅमोग्राफी, पॅप स्मिअर तपासणी, समुपदेशन आणि रक्ताच्या चाचण्याही केल्या जात आहेत. शहरातील काही आरोग्य केंद्रात नुकतीच मॅमोग्राफी तपासणी करण्यात आली. ही तपासणी मुख्यतः स्तनाचा कर्करोग निदानासाठी करण्यात येते.

आतापर्यंत एकूण १८८ महिलांची तपासणी करण्यात आली. पॅप स्मिअर ५६ तपासण्या करण्यात आल्या. पॅप स्मिअर ही तपासणी गर्भाशय मुखाचा कर्करोग निदान करण्यासाठी केली जाते. मॅमोग्राफी तपासणीसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दीड हजार तर पॅप स्मिअर तपासणीसाठी सातशे रुपयांपर्यंत खर्च येतो. या तपासण्या मनपाकडून मोफत केल्या जात आहेत. यासोबतच विविध प्रकारच्या रक्त तपासण्यांसाठी सुमारे दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्याही माेफत आहेत. या मोहिमेत एकूण ५०२ मातांची सोनोग्राफी व २२८ चेस्ट एक्सरे तपासणीही करण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून २१ हजार ४०१ रक्त तपासण्या करण्यात आल्या. सिडको एन-८ येथील हॉस्पिटलमध्ये सीएसएमएसएस कॉलेजच्या सहकार्याने १०८४ महिलांची दंतरोग तपासणी केली.

बातम्या आणखी आहेत...