आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछावणी परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून विविध पक्षांतर्फे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. छावणी परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व असल्याने माजी नगरसेवकांसह चार उमेदवारांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उद्धव गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन उमेदवारांविषयी माहिती घेत कल जाणून घेतला. या बैठकीत एका माजी नगरसेवकाचा तर एक पदाधिकाऱ्याला पक्षात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे छावणी परिषदेची निवडणूक भाजप-शिवसेना विरुद्ध महाविकास आघाडी अशी होण्याची चिन्हे आहेत.
छावणी परिषदेची निवडणूक ३० एप्रिल रोजी होणार आहे. निवडणुकीला अवघे ५० दिवस उरले असताना भाजप-शिंदे गट तसेच उद्धव ठाकरेंच्या शिवसेना गटातर्फे मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्याअनुषंगाने उद्धव गटाचे जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांनी १० मार्च रोजी माजी नगरसेवक किशोर कच्छवाह यांच्या कार्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. त्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक किशोर कच्छवाह, पद्मश्री अनिल जयस्वाल यांचा समावेश आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक शेख हनीफ आणि पूर्वाश्रमीचे भाजपचे कार्यकर्ते सुरेश वर्मा यांनी उद्धव गटात प्रवेश केला. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ७ वाॅर्डांपैकी ४ वाॅर्डांचे उमेदवार जवळपास निश्चित होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात महाविकास आघाडी असल्याने मित्र पक्षांनाही जागा द्यावी लागणार असल्याने सध्या कोणत्याही उमेदवाराची घोषणा मात्र करण्यात आली नाही.
निवडणुकीत उद्धवसेना की महाविकास आघाडीला संधी मिळणार याबाबत संभ्रम राज्यात महाविकास आघाडी निवडणुकांना सामोरे जाणार आहे. आघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश आहे. त्यामुळे छावणी परिषदेच्या निवडणुकीत केवळ उद्धवसेनेचेच उमेदवार राहतील की काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनाही संधी मिळेल याबाबत संभ्रम कायम आहे.
उमेदवार मविआचेच असतील छावणी परिषदेच्या ७ वॉर्डांतील उमेदवार महाविकास आघाडीचेच राहतील. त्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत लवकरच बैठक घेऊन पुढील दिशा ठरवण्यात येईल. - किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.