आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज वैध-अवैध उमेदवार घोषित होणार:विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी 266 अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. यात अधिसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी दाखल अर्जातून रविवारी २६६ अर्जांची छाननी केली. अधिसभा, विद्या परिषद व विविध अभ्यास मंडळासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. वैध-अवैध उमेदवारांची यादी मंगळवारी घोषित होणार आहे.

पहिल्या टप्प्यात पदवीधर प्रवर्गातील निवडणूक होत असून दुसऱ्या टप्प्यात अधिसभेच्या २९ जागांसाठी उर्वरित गटातून १० डिसेबर रोजी मतदान हाेणार आहे. यात प्राचार्य व महाविद्यालयीन प्राध्यापक गटातून प्रत्येकी दहा जागा, संस्थाचालक गटातून सहा, विद्यापीठ शिक्षकातून ३ जागा, विद्या परिषदेच्या आठ जागांसाठी मतदान होणार आहे. १९ नोव्हेंबर अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. तोपर्यंत महाविद्यालयीन शिक्षक ११८, संस्थाचालक २७, प्राचार्य २९, विद्यापीठ शिक्षक १४ याप्रमाणे १८८ अर्ज दाखल झाले. विद्या परिषदेसाठी ४७ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय विविध अभ्यास मंडळांसाठी २२३ अर्ज दाखल झाले. या सर्व जागांसाठी ४४९ अर्ज दाखल झाले.

या अर्जांची रविवार व सोमवार छाननी झाली. पहिल्या दिवशी विद्यापीठ, शिक्षक, प्राचार्य व विभागप्रमुख अशी २६६ अर्जांची छाननी झाली. सोमवारी प्राध्यापक (अधिसभा व विद्या परिषद), संस्थाचालक गटात दाखल १९२ अर्जांची छाननी झाली. यासंदर्भात २३ नोव्हेंबर रोजी अपील दाखल करता येतील. २४ नोव्हेंबर रोजी कुलगुरू डॉ. येवले अपिलांवर सुनावणी घेतील. २७ नोव्हेंबर सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येईल. याच दिवशी अंतिम यादी प्रकाशित होईल. १० डिसेंबरला मतदान, तर १३ डिसेंबरला निकाल जाहीर हाेईल.

निवडणुकीसाठी समिती स्थापन
पदवीधर मतदारसंघ निवडणूक व मतमोजणीसाठी ७ सदस्यांची समिती कुलगुरूंनी स्थापन केली. यात डॉ. एस. एन. दाते, डॉ. पी. बी. पापडीवाल, डॉ. अनिता मुरुगकर, डॉ. सचिन देशमुख, डॉ. मुस्तजिब खान, डॉ. प्रवीण यन्नावार, डॉ. कीर्तिवंत घडेले यांचा समावेश आहे. पदवीधर गटातून ३६,८०२ मतदारांनी नोंदणी केली असून २६ नाेव्हेंबरला मतदान होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...