आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद:शाळाबाह्य मुलांची शोधमोहिम 20 मार्चपर्यंत स्थगित

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत १ ते १० मार्च या कालावधीत जिल्ह्यात शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, सध्या जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ही मोहीम २० मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल यांनी सांगितले.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक ते दहा मार्च या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये तीन ते सहा व सात १७ वयोगटातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले जाणार होते. शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत वेगवेगळ्या विभागाच्या समन्वयातून विविध वयोगटातील शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यात येणार होता. त्यामध्ये सरकारी, खासगी शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांची मदत घेतली जाणार होती. या शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले होते. परंतू, जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शाळाबाह्य मुलांची शोध मोहिमेला देखील तात्पुर्ती स्थगिती देण्यात आली आहे. कोरोना परिस्थिती पुर्वपदावर आल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...