आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकमधून आलेल्या गीताच्या आई-वडिलांचा शोध:बासर, धर्माबादेतही सापडले नाहीत गीताचे कुटुंबीय; आपण पिता असल्याचा नाशकातील व्यक्तीचा दावा

नांदेडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आपले घर रेल्वेस्टेशनच्या बाजूला, मंदिर व नदीच्या आसपास असल्याचे गीता सांगते

सुमारे वीस वर्षांपूर्वीचा काळ... तेव्हा अवघ्या ७-८ वर्षांची असलेली मूकबधिर गीता रेल्वेने थेट अमृतसरला पोहोचली. नंतर पाकिस्तानात समझोता एक्स्प्रेसमध्ये सापडली. अजूनही गीता आहे कोण, तिचे आई-वडील कोण आणि कुठे आहेत, हा शोध सुरूच आहे. कुटुंबीयांच्या शोधासाठी गीता नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद व पुढे तेलंगणातील बासरपर्यंत गेली. तिने सांगितलेली ठिकाणे ओळखीची असली तरी कुटुंबीयांचा शोध मात्र लागला नाही. दरम्यान, गीतासोबत असलेल्या एका संस्थेच्या सदस्यांना नाशिकवरून एक फोन आला आणि आशेचा किरण डोकावला. आपण गीताचा पिता असल्याचा दावा या व्यक्तीने केला. त्यामुळे नांदेड येथून रात्री १० च्या रेल्वेने गीता नाशिककडे रवाना झाली. गीता हिला २६ ऑक्टाेबर २०१५ रोजी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी भारतात आणले होते.

नदीकाठी मंदिर... अन् स्टेशनही :

आपले घर रेल्वेस्टेशनच्या बाजूला, मंदिर व नदीच्या आसपास असल्याचे गीता सांगते. त्याआधारे घराचा शोध सुरू आहे. शेतामध्ये ऊस आणि भुईमुगाचे पीक असल्याचे वर्णन तिने केले होते. त्यावरून हे गाव बासर असू शकते, असा अंदाज लावत इंदूरच्या आनंद सर्व्हिस सोसायटीचे ग्यानेंद्र पुरोहित यांनी गीताला बासरला नेले होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser