आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षक मतदारसंघाच्या गेल्या निवडणुकीत विक्रम काळे १९ व्या फेरीत निवडून आले होते. दुसऱ्या पसंतीच्या मतांसाठी पदवीधर असो अथवा शिक्षक, योग्य नियोजन केल्यास विजयश्री खेचून आणता येते. मात्र, भाजपचे दुसऱ्या पसंतीचे नियोजन चुकल्याचा फटका बसला. काळेंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष असूनही भाजपला तो कॅश करता आला नाही. सूर्यकांत विश्वासराव यांना पडलेली मते ही काळेंच्या अँटी इन्कबन्सीची असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
विक्रम काळेंना सततच्या प्रवासातून शिक्षकांचा वैयक्तिक संपर्क आणि मतदारसंघात केलेली सर्वाधिक नोंदणी हीच त्यांच्या विजयाची पायाभरणी झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीमध्येही काळेंनाच सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
जुनी पेन्शन देण्याबाबत आश्वासनाचा पाठपुरावा करू : आ. चव्हाण विश्वासरावांमुळे बिघडले पाटलांचे गणित विश्वासराव यांना १३५४३ मते पहिल्या पसंतीची मिळाली. त्यामुळे विक्रम काळेंविरोधातला रोष विश्वासराव यांच्याकडे वळला. तसेच विश्वासराव यांच्या मतदारांनी पहिल्या पसंतीवरच समाधान मानल्यामुळे त्यांनी दुसऱ्या पसंतीची मते कमी टाकल्यामुळे भाजपची अडचण झाली. त्यामुळे त्यांची निम्मी ६७७१ मते भाजपला मिळाली असती तर भाजपचा विजय झाला असता हे गणित मांडले जात होते. संजय तायडे तसेच मनोज पाटील, प्रदीप साळुंखे, नितीन कुलकर्णी यांनादेखील कमी मतदान झाल्याचा भाजपला फटका बसला.
असे मिळाले दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारांचे मतदान बाद उमेदवार विक्रम काळे किरण पाटील सूर्यकांत विश्वासराव २४७५ २४६१ कालिदास माने ३१५ १०१ मनोज पाटील ३२२ १९४ प्रदीप साळुंखे १३६ ४६ संजय तायडे १३४ १७१ नितीन कुलकर्णी २३ ३७
...तर विजय झाला असता ^विक्रम काळेंना शिक्षकांचा विरोध होता. विश्वासरावांना पडलेली मते विक्रम काळेंवर असलेल्या रागापोटीची होती. त्यांच्या दुसऱ्या पसंतीची मते ५० टक्के भाजपला मिळाली असती तर विजय झाला असता. - शिरीष बोराळकर,राज्य प्रवक्ते भाजप.
कामाच्या पावतीचे यश
^काळंेनी केलेल्या कामांचे हे यश आहे. जुनी पेन्शनच्या रागाचा फटका आम्हालाही बसला. अन्यथा पहिल्या फेरीत विक्रम काळे निवडून आले असते. शिक्षकांना पेन्शन देण्याबाबत दिलेल्या आश्वासनाचा आता पाठपुरावा करू.
- सतीश चव्हाण, आमदार राष्ट्रवादी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.