आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरटीई प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु असून, ड्रॉ मध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. परंतु या मुदतीतही प्रवेश प्रक्रिया पूर्ण न होवू शकलेली नाही.
दिलेल्या मुदतीत केवळ 1965 जणांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित प्रवेश निश्चित करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, ड्रॉ झाल्यापासून आता ही दुसऱ्यांदा प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
आर्थिक दुर्बल घटकातील पालकांच्या पाल्यास माेेफत शिक्षणाचा हक्क मिळावा. यासाठी खासगी शाळांमध्ये 25 टक्के जागांवर प्रवेश देण्यात येेतो. शैक्षणिक वर्ष 2023-2024 करिता फेब्रुवारी महिन्यात अर्ज प्रक्रिया शाळांसाठी सुरु करण्यात आली होती. तर पालकांसाठी मार्च मध्ये नोंदणी प्रक्रिया करण्यात आली आणि प्रवेशासाठी ड्रॉ देखील करण्यात आला. 13 एप्रिल पासून पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 25 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु आरटीईच्या पोर्टलवर येणाऱ्या अडचणी पाहता 8 मे पर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पालकांना मुदत देण्यात आली होती. ही मुदत सोमवार दि. 8 मे रोजी संपली.
परंतु या दिलेल्या मुदतीतही प्रवेश पूर्ण न झाल्याने आता दुसऱ्यांदा मुदवाढ देण्यात आली आहे. या नव्या तारखेनुसार आता 15 मे पर्यंत पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश निश्चित करायचे आहेत. ही अंतिम मुदतवाढ अणार आहे. असे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिलेल्या सूूचनापत्रात म्हटले आहे. यंदा छत्रपती संभाजीनगरसाठी आरटीई प्रवेश पात्र शाळांची एकूण संख्या 545 आहे. प्रवेश क्षमता 4062 असून, यासाठी 20 हजार 779 अर्ज आले आहेत. त्यापैकी ड्रॉ मध्ये 4035 विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी सोमवारपर्यंत 1965 जणांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही 2088 जणांचे प्रवेश निश्चित होणे बाकी असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करणे अनिवार्य आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.