आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दोन जुलैपासून दिल्लीसाठी दुसरे विमान ; आठवड्यातून तीन दिवस, वेळ सकाळी 9.30

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या २ जुलैपासून दिल्ली-औरंगाबाद हे सकाळच्या सत्रातील विमान सुरू करणार असल्याची घोषणा इंडिगोचे उपाध्यक्ष संजीव रामदास यांनी केली. मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही सेवा सुरू राहील. एअर इंडिया, इंडिगो आणि आता फ्लाय बिग या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबादशी दिल्ली, मुंबई, हैदराबाद ही शहरे जोडली गेली आहेत. औरंगाबादेतून परदेशात जाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. याशिवाय पर्यटनासाठी वर्षाकाठी चार ते साडेचार लाख लाेक येतात. परदेशात जाण्यासाठी दिल्लीहून अधिक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे औरंगाबादेतून राजधानीत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सध्या दिल्लीसाठी एअर इंडियाचे एकच विमान असून, त्याची वेळही सायंकाळी सव्वापाचची आहे. आता इंडिगो दुसरे विमान सकाळच्या सत्रात सुरू करणार आहे. २ जुलैपासून सुरू हाेणारे दिल्ली-औरंगाबाद विमान दिल्लीहून सकाळी ७.४० वाजता निघून औरंगाबादेत ९.३० वाजता पाेहाेचेल, तर औरंगाबादेतून १० वाजता उड्डाण करून दिल्लीत ११.५० वाजता लँड करेल. १ जून रोजी फ्लाय बिगने औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवा सुरू केली. याच वेळी विमानतळ प्राधिकरणाने टूर ऑपरेटरसाेबत घेतलेल्या बैठकीत उमरानिमित्त औरंगाबादेतून आखाती देशात जाणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असल्याने विमानसेवा सुरू झाल्यास उत्तम व्यवसाय शक्य असल्याचे विमान कंपन्यांना आकडेवारीद्वारे पटवून दिले. त्यामुळे आगामी काळात औरंगाबादेतून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू हाेऊ शकतात, असे औरंगाबाद डेव्हलपमेंट टुरिझम फाउंडेशनच्या सिव्हिल कमिटीचे अध्यक्ष सुनील कोठारी म्हणाले.

फ्लाय बिगने हैदराबाद सेवा सुरू करून इंदूर, कोल्हापूर, पुण्यासाठी विमान सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे इंडिगोने कोरोनापूर्वी सुरू असलेली औरंगाबाद-बंगळुरू विमानसेवा हिवाळ्याआधी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. लवकरच बंगळुरू विमानसेवेची घोषणा होऊ शकते असे संकेत कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिले. औरंगाबाद-बंगळुरू सेवेला उत्तम प्रतिसाद होता. पण सध्या हे उड्डाण बंद असल्याने प्रवाशांना शिर्डी गाठावे लागते. अहमदाबाद सेवेचीही प्रतीक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...