आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली कोरोना:हिंगोली जिल्हयातील कोरोना रुग्णाचा दुसरा अहवाल निगेटीव्ह, प्रशासनाने सोडला सुटकेचा निःश्‍वास

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले

हिंगोली जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधीत रुग्णाचा आयसोलेशनचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पाठविलेला दुसरा स्वॅब नमुना निगेटीव्ह आला आहे. याबाबतचा अहवाल गुरुवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्यानंतर यंत्रणांनी सुटकेच निःश्‍वास सोडला आहे. 

हिंगोली जिल्हयात एका रुग्णाला सर्दी, खोकला, तापीची लक्षणे असल्यामुळे त्याला ता. ३१ मार्च रोजी शासकिय रुग्णालयाच्या आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे स्वॅबनमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले होते. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी तातडीने नियोजन करून कामाचे स्वरुप स्पष्ट केले होते. 

या रुग्णाचा त्याचा आयसोलेशन वॉर्ड मधील चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर त्याचा स्वॅबचा पहिला अहवाल बुधवारी ता. १५ सायंकाळी आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून त्याचा पहिला अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यानंतर आज अहवाल गुरुवारी ता. १६ प्राप्त झालेला दुसरा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

यासंदर्भात शासकीय रूग्णालय संपर्क साधला असता त्या रुग्णाचे दोन्ही स्वॅब नमुने निगेटीव्ह आल्यानंतर त्याच्या सुट्टी बाबत शुक्रवारी निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्यातरी त्या रुग्णाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसू लागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...