आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अभ्यासक्रम:एनसीआरटी बारावीच्या पाठयपुस्तकात कलम 370; विद्यार्थी अभ्यासणार जम्मू -कश्मीर

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुस्तकात राज्यात राष्ट्रपती शासन लावण्यापासून ते 14 महिन्यात धारा 370 रद्द करण्यासंदर्भातील सर्व माहिती दिली
Advertisement
Advertisement

कलम 370 नुसार जम्मू काश्मीरची एक वेगळी राज्यघटना होती. या कलमानुसार सुरक्षा, परराष्ट्र धोरण, अर्थ, दळणवळण या बाबी सोडल्या तर तिथे कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेची संमती असावी लागत होती. त्यामुळे तिथल्या रहिवाशांसाठी नागरिकत्व, मालमत्तेची मालकी, मूलभूत हक्क या विषयीच्या तरतुदी संपूर्णपणे वेगळ्या आहेत. जम्मू काश्मीर वगळता भारतातल्या इतर कोणत्याही राज्यातील लोक इथे मालमत्ता विकत घेऊ शकत नाही. हे निमय असलेले कलम 370 भारत सरकारने रद्द केले. याचा आता एनसीआरटीईने बारावीच्या पाठ्यपुस्तकात समावेश केला आहे.

नॅशनल काऊंसिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग (एनसीआरटी) नेहमीच अभ्यासक्रमात चालू घाडामोडींस सामाजिक बदलांच्या विषयांना देखील समाविष्ट करत आले आहे. त्यानुसार आता एनसीआरटीने बारावीच्या "राजनीतिक विज्ञान' या पाठ्यपुस्तकात मोठे बदल केले आहेत. या पुस्तकातील जम्मू कश्मीर मे "अलगाववादी की राजनीती ' यावर असलेला उतारा बदलण्यात आला असून, त्याऐवजी आता जम्मू कश्मीर मध्ये हटवण्यात आलेले कलम 370 हा पाठ्यक्रम जोडण्यात आला आहे. अशी माहिती सीबीएसई शाळेतील शिक्षकांनी दिली. गेल्या वर्षी म्हणजे 5 ऑगस्ट 2019 रोजी लोकसभेतून जम्मू-कश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याचा अध्यादेश पास करण्यात आला होता. पुस्तकात राज्यात राष्ट्रपती शासन लावण्यापासून ते 14 महिन्यात धारा 370 रद्द करण्यासंदर्भातील सर्व माहिती देण्यात आली आहे असेही शिक्षकांनी सांगितले. अभ्यासक्रमात करण्यात येत असलेले बदल हे आपल्या देशातील बदलत्या परिस्थितीची सामाजिक राजकीय जनजागृती करणे देखील असल्याचे शिक्षकांनी म्हटले आहे.

Advertisement
0