आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेशद्वाराचे संवर्धन आणि सुशोभीकरण:कार्यकर्त्यांच्या दबावामुळे थांबवले सेक्युरिटी गेटचे काम

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सुशोभीकरणासोबत नवे प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू आहे, पण या सुशोभीकरणाला काहींनी विरोध केला आहे. त्यामुळे कुलगुरूंनी सेक्युरिटी गेटचे बांधकाम थांबवले आहे. गेट पाडण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार आणि आर्किटेक्टशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.

प्रवेशद्वाराचे संवर्धन आणि सुशोभीकरणाचे काम प्रशासनाने हाती घेतले होते. कुलगुरूंचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ मानला जातो. सुरक्षा भिंती, बाजूच्या दोन्ही रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षा गेट आणि सुशोभिकरणाचे काम नामविस्तार दिनापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. दिल्ली येथील इंडिया गेटच्या धर्तीवर विद्यापीठातील या गेटच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पावर २ कोटींचा खर्च करण्यात येत आहे. प्रवेशद्वारातून जाण्याऐवजी आता दोन्ही बाजूंनी ये-जा करावी लागेल. त्यासाठी रस्ताही तयार आहे. विद्यापीठात येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेक्युरिटी गेटची उभारणी सुरू होती. त्याच्या दोन्ही बाजूंनी पाण्याचे कारंजेही प्रस्तावित आहेत. पण हे प्रतिगेट होत असल्याचा आरोप करत काही जणांनी विरोध केला आहे. त्यामुळे काम थांबवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...