आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:खा. सुजय विखेप्रकरणी शिर्डी विमानतळाचे फुटेज जतन करा, रेमडेसिविरप्रकरणी हायकोर्टाचे आदेश

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरचे भाजप खासदार सुजय विखे यांनी १० हजार रेमडेसिविर इंजेक्शन विमानातून आणल्याच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे व न्या. बी. यू. देबडवार यांनी शिर्डी विमानतळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले. नगरचे जिल्हाधिकारी खा. विखे यांना पाठीशी घालत असल्याचे निरीक्षणही खंडपीठाने नोंदवले. राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांना नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

कोरोना रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झालेला असताना खा. विखे यांनी विमानाने १० हजार इंजेक्शन आणले. यावर सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, एकनाथ घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी औरंगाबाद खंडपीठात अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल करून सदर प्रकरणात विखे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती केली आहे.

प्रधान सचिव, गृह विभाग, मुंबई यांना शिर्डी विमानतळ येथील १० एप्रिल २०२१ ते २५ एप्रिल २०२१ पर्यंतच्या सर्व खासगी विमानांच्या वेळा, त्यांतून वाहतूक करण्यात आलेल्या साहित्यांची खोकी/माल याचे सीसीटीव्ही फुटेज घेऊन जतन करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणात काही रुग्णांच्या वतीने दाखल करण्यात आलेले हस्तक्षेप अर्ज न्यायालयाने फेटाळले. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. प्रज्ञा तळेकर व अॅड अजिंक्य काळे काम पाहत आहेत, तर शासनाच्या वतीने सरकारी वकील डी. आर. काळे काम पाहत आहेत.

बातम्या आणखी आहेत...