आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्याने मिलिंद कला महाविद्यालयाच्या एन. सी. सी. च्या छात्रसैनिकांच्या माध्यमातून सीड बॉल निर्मितीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. काळी माती, शेणखत, गांडुळखत एकत्र करून त्यांचे 650 गोळे (सीड बॉल) तयार केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी सीड बॉल प्लांटेशनची संकल्पना मांडली. या संकल्पनेला महाविद्यालयातील एन.सी.सी. विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ. जितेंद्र देसले आणि एन. सी. सी. च्या छात्रसैनिकांनी मूर्त रुप दिले.
प्रामुख्याने गुलमोहोर, कडूलिंब, सिसव, बदाम, अशोका इ. झाडांचे बी सुरक्षित ठेऊन, सहाशे पन्नास सीड बॉलची निर्मिती केली. हे सीड बॉल नियोजनबध्द पध्दतीने डोंगर रांगावर तसेच शहराच्या आजुबाजूच्या परिसरात टाकल्या जातील. पाऊस पडल्यावर या मातीच्या गोळ्यामध्ये असलेले बीज आपोआपच फुटू लागतात आणि हळूहळू निसर्गाच्या साहाय्याने ते बीज एक रोप बनते. हा पर्यावरण रक्षणासाठी एक नवा उपक्रम आहे.
दिनांक 16 मे रोजी जेष्ठ पौर्णिमेनिमित्त दुसऱ्या टप्प्यातील सीड बॉल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील लेणी परिसरात 350 सीड बॉल रोवण्यात आले. पाऊस पडल्यानंतर उर्वरीत सीड बॉल नियोजनबध्दतेने पर्यावरण संरक्षणासाठी टाकण्यात येतील. या उपक्रमाचे हे महाविद्यालयाचे दुसरे वर्ष आहे.
प्राचार्या डॉ.वैशाली प्रधान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम संपन्न झाला. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस.पी.बुरकुल, पाली विभाग प्रमुख भदंत एम. सत्यपाल महाथेरो, पर्यवेक्षक डॉ. रामनाथ पवार, नॅक समन्व्यक डॉ.एफ.के.पठाण, क्रीडा विभाग प्रमुख डॉ.गौतम सिरसाठ, तसेच सिनियर अंडर ऑफिसर रोहित गवई यांचे योगदान लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.