आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामास्टर्स संघटनेतर्फे विद्यापीठ मैदानावर आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय जलतरण व अॅथलेटिक्स मास्टर्स गेम्समध्ये सिमा वर्मासह औरंगाबादच्या राजेश पाटील, सतिश यादव, मंगल सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत २५० खेळाडू सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्घाटन छावणीचे सीईओ संजय साेनवणे व डॉ. दयानंद कांबळे यांच्या हस्ते झाले.
विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे : ४० वर्षे महिला ५००० मी. धावणे - सिमा वर्मा, पालघर (प्रथम), मंगला बागुल, नाशिक (द्वितीय), ५० वर्षे गट - शिल्पी मंडल (पालघर), मंगल दळवी (मुंबई). ५५ वर्षे गट - आरती गायकवाड (ठाणे). पुरूष ४० वर्षे गट - मंगल सिंग (औरंगाबाद), अरुण मोरे, परेश वैद्य (पालघर). ५० वर्षे गट - सतिश यादव (औरंगाबाद), विनोद जांगिड (मुंबई). पुरुष भालाफेक ५० वर्षावरील गट - राजेश भोसले (औरंगाबाद), सत्यवान (मुंबई).
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.