आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाबाजार:​​​​​​​हिंगोलीतून विदर्भात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारे 77 क्विंटल धान्य पकडले, दोन पिकअपसह 13.56 लाखांचा ऐवज जप्त, दोघांवर गुन्हा

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी सदर कारवाईत 13.56 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

हिंगोली शहरातून स्वस्त धान्यांचा 77 क्विंटल गहू व तांदूळ विदर्भात काळ्याबाजारात विक्रीसाठी जात होता. दरम्यान, ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यांच्या पथकाने हे ट्रक पकडले असून या प्रकरणी गुरुवारी ता. 8 दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी सदर कारवाईत 13.56 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहरातून स्वस्त धान्याचा गहू व तांदूळ दोन पीकअप मध्ये भरून वाशीम येथे काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिलाळी होती. त्यावरून सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, राजू ठाकूर याच्या पथकाने बुधवारी ता. 7 रात्री शहरात वाहनांची तपासणी सुरु केली होती.

यावेळी अकोला रोड भागात दोन पिकअप व्हॅनची (क्र.एमएच-40-सीडी-1174 व एमएच-37-टी-1664) पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये एका व्हॅनमध्ये स्वस्त धान्य दुकानाचा 34 क्विंटल तांदूळ तर 5 क्विंटल तांदूळ आढळून आला. तर दुसऱ्या व्हॅनमध्ये 38 क्विंटल गहू आढळून आला आहे. पोलिसांनी अरबाज आसीफ खान (रा. हिंगोली), कैलास प्रेमानंद पेशकलवाड (रा. उकळीपेन, जि. वाशीम) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी धान्याबाबत माहिती देता आली नाही.

त्यामुळे पोलिसांनी सदर धान्य व दोन व्हॅन असा 13.56 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या तक्रारीवरून वरील दोघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...