आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ:‘इंद्रधनुष्य'साठी 28 कला प्रकारांत 39 जणांच्या संघाची निवड ; राजभवनाचा युवा महोत्सव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर येथील राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात यंदाचा राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सव होणार आहे. त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ३९ जणांचा संघ निवडण्यात आला. मुख्य नाट्यगृहात २८ ऑक्टोबरला निवड चाचणी पार पडली. यात २८ कला प्रकारांसाठी ३९ जणांचा संघ निवडला आहे. त्यात २५ मुले आणि १४ मुलींचा समावेश आहे.

राज्यपाल कार्यालयाचा इंद्रधनुष्य ५ ते ९ नोव्हेंबरदरम्यान होत आहे. राज्यातील सर्व प्रादेशिक विद्यापीठांचे संघ दाखल त्यात सहभागी होतात. १६ ते १९ नोव्हेंबरदरम्यान विद्यापीठाच्या युवा महोत्सवात विशेष कामगिरी केलेल्या युवा कलावंतांचा संघात समावेश आहे. १८८ कॉलेजांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यातील प्रथम, द्वितीय पारितोषिके मिळवलेल्यांना संघात स्थान दिले. डॉ. दासू वैद्य यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीतील डॉ. संजय देवळाणकर, प्रा. संभाजी भोसले, प्रा. मुस्तजीब खान, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. संजय सांभाळकर यांनी ही निवड केली आहे. २८ ऑक्टोबरला ऑडिशन घेऊन संघाची निवड केली. उस्मानाबाद उपकेंद्रातील डॉ. गणेश शिंदे, डॉ. निर्मला जाधव संघप्रमुख आहेत. संघाचे व्यवस्थापक म्हणून गौतम सोनवणे काम पाहतील. डान्सचे कोच म्हणून संजय जाधव संघासोबत जातील.

बातम्या आणखी आहेत...