आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:छावाच्या औरंगाबाद युवक जिल्हाध्यक्षपदी अमोल काळेंची निवड

वाळूज23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय छावा संघटनेच्या औरंगाबाद युवक जिल्हाध्यक्षपदी बजाजनगरातील अमोल काळे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना नुकतेच केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले.

त्यांनी समाजाेपयोगासाठी केलेले अनेक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली असल्याचे नानासाहेब जावळे म्हणाले. या वेळी विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष किशोर शिरावत, किशोर सदावर्ते, किशोर मगर, जालिंदर मगर, योगेश मालोदे, प्रशांत खंडागळे, सागर निकम, अण्णासाहेब कानडे, कैलास वाघ, अजय कोळगे, नानासाहेब पाचपुते आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...