आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुकास्पद:रॉकेट प्रक्षेपणासाठी कल्याणी देठेची निवड ; विज्ञान शिक्षिका शीतल जाधव यांनी केले विशेष प्रयत्न

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई येथे १९ फेब्रुवारी २०२३ रोजी राेजी होणाऱ्या रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रमासाठी गंगापूर तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील आठवीची विद्यार्थिनी कल्याणी शेषराव देठेची निवड झाली आहे. विज्ञान शिक्षिका शीतल जाधव यांचे तिला मार्गदर्शन लाभले.

चेन्नईत देशातील पहिले खासगी रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रम होणार आहे. अमेरिका इंडिया फाउंडेशन व स्टारलाइट टेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान पिको उपग्रह प्रक्षेपण कार्यशाळा घेण्यात आली हाेती. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १३ जिल्हा परिषद व मनपा शाळांतील आठवी ते दहावीतील १०० विद्यार्थ्यांची निवड केली हाेती. चेन्नई येथील स्पेस झोन इंडिया संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद यांच्या नेतृत्वात ७ शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना तीन दिवस अतिसूक्ष्म पद्धतीने प्रशिक्षण दिले आहे. याप्रसंगी स्टारलाइटचे सीईओ व्यंकटेश मूर्ती, अमेरिका इंडिया फाउंडेशनचे शंकरदयाळ शर्मा, प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख, संगीता सावळे, डॉ. प्रकाश मांडे, संचित गुजराल आदींची प्रमुख उपस्थिती होती. शीतल जाधव यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...