आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद जिल्हयातील गंगापूर तालुक्यातील आसेगाव मधील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील इयत्ता आठवीच्या कल्याणी शेषराव देठेची निवड चेन्नई येथे होणाऱ्या रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे. तिला विज्ञान शिक्षिका शितल जाधव यांचे उपयुक्त मार्गदर्शन लाभले.
19 फेब्रुवारी 2023 रोजी चेन्नई येथे देशातील पहिले खासगी रॉकेट प्रक्षेपण कार्यक्रम होणार आहे. यासाठी सूक्ष्म पध्दतीने काम करणाऱ्या कल्याणी देठेची निवड करण्यात आली.जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आसेगावच्या व पंचक्रोशीच्या इतिहासात शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. अमेरिका इंडिया फाउंडेशन व स्टारलाईट टेक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान पिको उपग्रह प्रक्षेपण कार्यशाळा शाळेत घेण्यात आली. या कार्यशाळेत सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष ड्रोन पिको उपग्रह प्रक्षेपण करून दाखवले.
यात औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण 13 जिल्हा परिषद व महानगरपालिका शाळांमधील 8 वी ते 10 वी मध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यातून प्रत्यक्ष रॉकेट प्रक्षेपणासाठी कल्याणीची निवड करण्यात आली. या सर्वांनी या प्रशिक्षण कार्यशाळेत प्रत्यक्ष ड्रोन तयार करणे उपग्रहाचे सुट्या भागापासून उपग्रह तयार करण्यासाठी स्वतः सर्व साहित्याची हाताळणी करणे या बाबींचा समावेश होता.यासाठी चेन्नई येथील स्पेस झोन इंडिया संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद यांच्या नेतृत्वात 7 शास्त्रज्ञांनी विद्यार्थ्यांना तीन दिवस अतिसूक्ष्म पद्धतीने प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी स्टारलाईटचे सीईओ व्यंकटेश मूर्ती, अमेरिका इंडिया फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक शंकर दयाळ शर्मा, डायटचे प्राचार्य डॉ. कलीमोद्दीन शेख, उपशिक्षणाधिकारी संगीता सावळे, डायटचे अधिव्याख्याता डॉ.प्रकाश मांडे, संचित गुजराल आदींची प्रमुख उपस्थिती होती. शितल जाधव यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.