आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घोषणा:विद्यापीठाच्या अटल इन्क्युबेशन सेंटरची ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’साठी निवड

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अटल इन्क्युबेशन सेंटरची ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ योजनेसाठी निवड झाली आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने ही घोषणा केली आहे. देशातील ६९ पैकी ३५ सेंटर्सची निवड झाली. त्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा समावेश आहे. यामुळे मराठवाड्यातील युवकांच्या बिझनेस आयडियांना प्रत्यक्षात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तत्कालीन कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडेंच्या कार्यकाळात विद्यापीठाने बजाज इन्क्युबेशन सेंटरची स्थापना केली होती. नंतर विद्यापीठाला अटल इन्क्युबेशन सेंटरही मिळाले. आता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनात ही सेंटर्स उत्तम काम करताहेत. सध्याचे संचालक डॉ. सचिन देशमुख, सीईओ अमित रंजन इन्क्युबेटर्सला प्रोत्साहन देऊन त्यांच्या आयडियाला मूर्त रूप देत आहेत. ‘स्टार्टअप’चे ४३ प्रस्ताव आतापर्यंत मंजूर आहेत. आता जास्तीत जास्त युवकांना नव्या योजनेत बीज भांडवल उपलब्ध करून दिले जाईल.

त्यासाठीच ‘स्टार्टअप इंडिया सीड फंड’ सुरू केला आहे. देशातील ६९ अटल इन्क्युबेशन पैकी ३५ सेंटर्सची निवड झाली आहे. मराठवाड्यातील युवकांना इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून आता जानेवारीत अर्ज करता येईल. स्टार्टअप्सकडे डीपीआयआयटीची मान्यता असावी. अर्जाच्या वेळी दोन वर्षांपेक्षा अधिक जुना स्टार्टअप्स नसावा, कोअर प्रॉडक्ट, सर्व्हिस किंवा बिझनेस डिस्ट्रिब्युशन मॉडेलसाठी तंत्रज्ञानाचा आधार असल्यास प्राधान्य दिले जाईल.

स्टार्टअपला एकापेक्षा अधिक अर्थसाहाय्य दिले जाणार नाही केंद्र किंवा राज्य सरकारच्या योजनेंतर्गत दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक मदत घेतलेली नसावी. स्टार्टअपमध्ये शेअर होल्डर्सचा हिस्सा अर्ज करताना ५१ टक्के असावा. कोणत्याही स्टार्टअपला एकापेक्षा अधिक अर्थसाहाय्य दिले जाणार नाही. -डॉ. सचिन देशमुख, संचालक, अटल इन्क्युबेशन सेंटर

५० लाखांचे कर्ज मिळेल बिझनेस आयडिया, प्रोटोटाइप विकसित करणे, उत्पादनाच्या चाचण्या घेणे, प्रत्यक्ष उद्योग किंवा व्यवसायात रूपांतर करण्यासाठी २० लाखांचे अनुदान दिले जाईल. स्टार्टअप्स गुंतवणूकदार, भांडवलदार, व्यावसायिक बँका किंवा वित्तीय संस्थांकडून अर्थसाह्य देतील. उद्योगांच्या विकासासाठी ५० लाखांचे विनातारण कर्ज मिळेल. -अमित रंजन, सीईओ, अटल इन्क्युबेशन सेंटर

बातम्या आणखी आहेत...