आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजवंतांना उबदार कपड्यांचे वाटप:स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या जन्मदिनानिमित्ताने राबवला उपक्रम

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्व. रमेशचंद्र अग्रवाल यांच्या ७८ व्या जन्मादिनानिमित्त ११ डिसेंबर रोजी रमेश अँड शारदा अग्रवाल फाउंडेशनतर्फे गरजवंतांना उबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.दै. दिव्य मराठीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही रमेश अँड शारदा अग्रवाल फाउंडेशनतर्फे वस्त्रदान उपक्रम राबवण्यात आले. याद्वारे संकलित झालेले उबदार कपडे औरंगाबाद पेट लव्हर्स असोसिएशनच्या अध्यक्षा बेरिल सांचिस यांच्या सहकार्याने वाटप केले. बीड बायपास रोडवरील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या गरिबांना कपडे देण्यात आले. यात लहान मुलांसाठीचे ६५ स्वेटर, १५ कानटोप्या, मोठ्या पुरुष-महिलांसाठी ३० स्वेटर तसेच १५ उबदार चादरी वाटप करण्यात आल्या. या वेळी लहान मुलांना स्वेटर, कानटोप्या, तर काहींना टी-शर्ट देण्यात आले. या वेळी चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर वेगळेच हास्य बघायला मिळाले. कपडे मिळण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघून आई-वडिलांनासुद्ध आनंद झाला.

बातम्या आणखी आहेत...