आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही महिन्यांमध्ये विद्यार्थिनींसोबत गैरवर्तनाचे प्रकार वाढले. त्यामुळे मुलींनी वाईट प्रसंगात कसा विराेध करावा, वेळप्रसंगी त्यांना स्वत:चे रक्षण स्वत:च करता यावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शारदा मंदिर कन्या प्रशालेत मंगळवारपासून विद्यार्थिनींसाठी लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यात आठवी, नववीच्या ७० मुलींनी सहभाग घेतला. त्यामुळे आता सर्व मुलींना प्रशिक्षण देणार असल्याचे मुख्याध्यापिका डॉ. सविता मुळे, क्रीडा शिक्षिका हेमलता पवार यांनी सांगितले. जनहित कक्षाच्या विधी विभागाचे उपशहर संघटक अमित जयस्वाल, स्वामी समर्थ केंद्र, बजाजनगरचे किशोर पांढरे यांनी प्रायोगिक तत्त्वावर विद्यार्थिनींना कराटे, लाठी-काठी, दंड साखळीचे प्रशिक्षण शाळेतच देणे सुरू केले.
एक महिना प्रशिक्षण मुलींना सक्षम करणे आणि वेळप्रसंगी त्यांना संकटाचा विरोध करता यावा. स्वत:चे संरक्षण करता यावे. या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. आता प्रत्येक वर्गातील मुलींना एक महिना प्रशिक्षण दिले जाणार आहे. -वंदना रसाळ, उपमुख्याध्यापिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.