आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाच्या भागीदारीतील जमीन बनावट व्यक्ती उभी करून परस्पर विकली:संशयितांवर गुन्हा; 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादच्या हर्सूल शिवारात भावाच्या भागिदारीमध्ये असलेली जमीन बनावट कागदपत्रे, स्वाक्षऱ्या करुन दुसऱ्याच व्यक्तीला भाऊ म्हणून उभा करत परस्पर विकली. याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका संशयित आरोपीच्‍या मुसक्या आवळल्या.

संतोष सुधाकरराव पिंगळे (50, रा. एन-12, स्‍वामी विवेकानंदनगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्‍याला 17 ऑगस्‍टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले.

प्रकरणात शरद दिगंबरराव गोमटे (48, रा. आयोध्या नगर, सिडको) यांनी फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, 1095 मध्ये गोमटे व प्रशांत रमेश धुमाळ यांनी भागिदारीमध्ये दोन एकर जमीन विकत घेतली होती. जमिनीचे सर्व अधिकार दोघांकडेच होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांत त्यांनी जमीन विकून सध्या त्यांच्या ताब्यात 50 आर. जमीन आहे. दरम्यान, प्रशांत धुमाळ याच्यावर गुन्हे दाखल झाल्याने तो बऱ्याच दिवसांपासून शहरातून पसार आहे. त्याचा गैरफायदा घेत त्याचा संशयित आरोपी भाऊ विवेक रमेशराव धुमाळ (45, रा. दिशा वुडस, हर्सूल) याने कट रचून साक्षीदार शेख अर्शद व इतर साथीदारांच्या मदतीने गोमटे व भाऊ प्रशांतच्या नावाने खोटा जीपीए, इसारपावती, इतर कागदपत्रे तयार केली.

सर्वांच्या नावावर स्वाक्षऱ्या केल्या; परंतु छायाचित्रे दुसऱ्यांची लावली. हा प्रकार गोमटे यांना कळाल्यावर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली. प्रकरणात सिटी चौक पेालिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयित आरोपीला आज न्‍यायालयात हजर करण्‍यात आले असता, आरोपीने गुन्‍हा करण्‍यासाठी सह आरोपींना मोबाइलवरुन संपर्क साधला आहे, तो मोबाइल हस्‍तगत करायचा आहे. बनावट जीपीए प्रकरणातून मिळालेली रक्कम हस्‍तगत करायची आहे. जमिनीचा मुख्‍त्‍यारनामा नोंदणी करण्‍यासाठी बनावट आधारकार्ड आरोपीने कोठे ठेवले याचा तपासकरुन ते जप्‍त करायचे आहे. गुन्‍ह्यात पसार आरोपींना अटक करायीच आहे. बनावट जीपीए देण्‍यासाठी संशयित आरोपींना आणखी कोणी मदत केली याचा तपास बाकी असल्याने संशयिताला पोलिस कोठडी देण्‍याची मागणी सरकारी वकीलांनी न्‍यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने संशयिताला 17 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

बातम्या आणखी आहेत...