आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य जप्त:रॉक्सी थिएटरजवळ बनावट मोबाइल, चार्जरची विक्री

औरंगाबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील रॉक्सी सिनेमागृह व मसाप सभागृहाच्या परिसरातील बड्या मोबाइल साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांत नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट साहित्याची विक्री सुरू असल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पाच विक्रेत्यांच्या दुकानांत कंपनीच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकून कारवाई केली. यात महेंद्र मंगल पुरी (शिवशक्ती मोबाइल शॉपी), प्रवीण हरिचंद्रल रामजी माळी (जगदंबा मोबाइल शॉपी ), जयशराम ऊर्फ जयेश जाईलाजी चौधरी (चामुंडा मोबाइल शॉपी), शैलेश गलारामजी सोलकी (हायफाय युयन मोबाइल शॉपी), अर्जुनसिंग चेतनसिंग राजपुत (राजलक्ष्मी मोबाइल शॉपी) विरोधात गुन्हा दाखल केला.

रेवनाथ केकाण यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या संस्थेला व्हिवो कंपनीच्या कॉपीराइटचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे अधिकार आहेत. त्यांना रॉक्सी परिसरातील दुकानांत बनावट साहित्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी क्रांती चौक ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांच्याकडे त्याची तक्रार केली. त्यानंतर उपनिरीक्षक छोटुराम ठुबे, प्रभाकर सोनवणे, अंमलदार इरफान खान, संतोष मुदिराज, भाऊसिंग चव्हाण यांनी छापे टाकले. यात एकूण ५ लाख १५ हजारांचे बनावट साहित्य जप्त करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...