आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फटका बसणार नाही, उद्योजकांचा दावा:सेमिकंडक्टरचा तुटवडा, ऑटोमोबाईल क्षेत्रात अनियमितता, निर्मितीसाठी जगभरात प्रयत्न

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात सेमिकंडक्टरचा तुटवडा निर्माण झाल्याने ऑटोमोबाईल क्षेत्रात अनियमितता आली आहे. मागील आठ महिन्यांपासून ही परिस्थिती निर्माण झाली असली तरी यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षाला कोणताही फटका बसणार नसल्याचा निर्वाळा रुचा इंडस्ट्रीजचे उमेश दाशरथी यांनी दिला.

औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रात विशेषत: ऑटोमोबाईल क्षेत्रावर दबदबा असलेल्या बजाज कंपनीला दोन दिवस सुटीचे वृत्त परसरल्यानंतर 'दिव्य मराठी'ने बजाजवर अवलंबून असलेल्या व्हेंडर्सशी याबाबत चर्चा केली. यावेळी दाशरथी यांनी सांगितले की, मागील आठ महिन्यांपासून जगभरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, त्याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. उलट यामुळे सेमिकंडक्टरचे उत्पादन वाढवण्यावर होणार आहे.

उत्पादन वेळेआधी पुर्ण झाल्याने 30 टक्के कर्मचाऱ्यांना शनिवारी पगारी सुटी

बजाज कंपनीने आठवड्यातून दोन दिवस सुटी जाहिर केल्याची वार्ता औद्योगिक वर्तुळात परसल्यावर 'दिव्य मराठी'ने या प्रकरणाची शहानिशा केली. यावेळी कंपनीच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, अधून मधुन अशी ज्यादा सुटी आम्ही देत असतो. मात्र, आता काही घडले आणि आता सुटी देत आहोत, असे मुळीच नाही. हे नेहमीचे आहे. सध्या बजाजमधील तीनचाकींचे उत्पादन वेळेआधी पुर्ण झाल्याने 30 टक्के कर्मचाऱ्यांना शनिवारी सुटी दिली आहे. ही सुटी पगारी आहे. कुणाच्याही नोकरीवर या एक दिवसाच्या सुटीचा परिणाम हाेणार नाही. 100 वर्षात कधीतरी असे होत असते असे जाणकारांचे मत आहे.

सेमिकंडक्टरचे 80 टक्के उत्पादन तैवानमध्ये

सेमिकंडक्टरचे 80 टक्के उत्पादन तैवानमध्ये केले जाते. तर 20 टक्के उत्पादन युरोपिय देशांत होते. ऑटोमोबाईल इंडस्ट्री ऑटोमेशनवर स्थलांतरीत झालेली असल्याने सेमिकंडक्टरची आवश्यकता असते. हे सेमीकडंक्टर उपलब्ध होत नसल्याने अनियमितता आली आहे. अशी अनियमितता येऊ नये याकरीता जगभरात सेमीकंडक्टर बनवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

सेमीकंडक्टर निर्मितीमिळे आर्थिक झळ बसणार नाही

भारत सरकाने सेमीकंडक्टर निर्मितीवर इंसेंटिव्ह देऊ केले आहेत. त्यामुळे तीन बड्या उद्योगांनी 25 हजार कोटींची गुंतवणुक यामध्ये केली आहे. अनियमिततेची अडचण जगभरात आहे. मात्र, कुठेही मागणी कमी झालेली नाही. त्यामुळे सेमीकंडक्टरवर अवलंबून असलेल्या उद्योगांना कोणताही आर्थिक फटका बसणार नाही. लवकरच देशातच सेमीकंडक्टर उत्पादन सुरु होईल अन मार्ग मोकळा होईल.

काही अंशी परिणाम, पण नोकरी जाण्याचा धोका नाही

''बजाजने कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुटी दिल्याने त्यांना पुरवठा करणाऱ्यांनाही उत्पादन कमी करावे लागणार आहे. पण, ही परिस्थिती अधून मधुन थो‌ड्या प्रमाणात येत असते. त्याची आम्हाला सवय आहे'' असे उद्योजक मिलिंद कंक म्हणाले.

एक दिवस पगारी सुटी
तीनचाकी उत्पादनाच्या युनिटमधील कर्मचाऱ्यांना उत्पादन पुर्ण झालेले असल्याने एक दिवसाची सुटी दिली आहे. सेमीकंडक्टर नसल्याने आणि उत्पादन झालेले असल्याने त्यांना देण्यास काहीही काम नाही. त्यामुळे सुटी दिली आहे. ही सुटी पगारी आहे. याशिवाय संपूर्ण बजाज कंपनीला सुटी नसुन एकाच युनिटच्या कर्मचऱ्यांना आहे. ही संख्या एकुण कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के इतकी आहे. सोयीनुसार असे केले जात असते, यात नवीन काहीही नाही, अशी माहिती बजाज कंपनीतील सूत्रांनी दिली.

कोरोना, श्रीलंकेतील स्थितीचा परिणाम, पण फटका नाही - जाजू

सीएमआयएचे अध्यक्ष शिवप्रसाद जाजू यांनी सांगितले की, श्रीलंका तीनचाकींची मोठी बाजारपेठ आहे. श्रीलंकेत आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे तेथे पुरवठा केला जात नाही. याशिवाय कोरोनामुळे आयातीची चैन अद्याप पुर्णपणे रुळावर आलेली नाही. या सर्वांचा एकत्रित परिणाम उत्पादनावर होतो आहे. पण, ही काही चिंताजनक स्थिती नाही. उद्योगात असे होत असते. भारतात सेमीकंडक्टरच्या निर्मितीचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच आपल्याकडे सेमीकंडक्टर उपलब्ध होतील. वाहनांच्या इलेक्ट्रीकल बाबींसाठी याचा वापर केला जातो.

बातम्या आणखी आहेत...