आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी भवनात डॉ. मारुती तेगमपुरे, डॉ. अतुलकुमार चौरपगार यांनी संपादित केलेल्या एसएफआय चळवळीत कार्य करणाऱ्या माजी कार्यकर्त्यांच्या स्वकथनावर आधारित ग्रंथावर परिसंवादाचे आयोजन स्टुडंटस फेडरेशन ऑफ इंडियातर्फे केले होते. अध्यक्ष म्हणून माजी पोलिस आयुक्त उद्धव कांबळे उपस्थित होते. यावेळी ग्रंथावर प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, प्रा डॉ. उमाकांत राठोड यांनी भाष्य केले. आम्ही लढलो-आम्ही घडलो या ग्रंथाचे संपादक डॉ. मारुती तेगमपुरे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी अण्णा सावंत, प्रा. पंडित मुंढे, सुलभा मुंढे, भगवान भोजने, डॉ. संग्राम मोरे, अजय भवलकर, मारुती खंदारे, डॉ. ओमप्रकाश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा. डॉ. उमाकांत राठोड यांनी चळवळीचे महत्त्व विषद केले. अध्यक्षीय भाषणात कांबळे यांनी बदलत्या जागतिक भांडवलशाहीचे संदर्भ लक्षात आणून दिले. नितीन वाव्हळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अतुलकुमार चौरपगार यांनी आभार मानले. कार्यक्रमच्या यशस्वितेसाठी डॉ. दत्ता रणखांब, योगेश खोसरे, डॉ. भाऊसाहेब झिरपे, सुनीता लोंढे, सुनील राठोड, अशोक शेरकर, गणेश अलगुडे, विश्वजित काळे, भगवान श्रावण आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.