आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही शिवसेनेसोबतच - उदयसिंह राजपूत:औरंगाबादच्या शिवसेनेच्या तिन्ही आमदारांच्या संपर्क कार्यालयासमोर शुकशुकाट

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात ज्या जिल्ह्यातील सर्वाधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले, त्याच औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारांचे घर आणि कार्य लयात शुकशुकाट आहे. दिव्य मराठीच्या वतीने आमदारांची कार्यालयात आणि घरी जाऊन पाहणी केली.

शिवसेनेचे युवा सेनेचे पदाधिकारी आणि प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव ऋषिकेश जैस्वाल म्हणाले, आमचा देखील रात्रीपासून प्रदीप जैस्वाल याचा सोबत संपर्क झालेला नाही. मी रात्री सिंगापूर वरून मुंबईला आलो. त्यानंतर औरंगाबादला आलो आहे. माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार उदयसिंह राजपूत म्हणाले, मी वर्षावर असून शिवसेनसोबत आहे.

संजय शिरसाट यांच्या कोकणवाडी येथील कार्यालयात नेहमी कार्यकर्त्यांची वर्दळ असते. मात्र, आज या कार्यालयात शुकशुकाट होता. तर पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या कार्यालयातही फारशी गर्दी नव्हती. तर हेच चित्र नारळीबाग येथील प्रदीप जैस्वाल यांच्या कार्यलयातही होते. एरवी नेहमी या कार्यालयात गर्दी असल्याचे पहायला मिळते. दरम्यान आमदार अंबादास दानवे याच्याशी दिव्य मराठीने चर्चा केली असता ते म्हणाले, पक्षाला काही धोका नाही.

मी वर्षावर आहे - उदयसिंह राजपूत

दिव्य मराठीशी बोलताना कन्नडचे आमदार उदयसिंह राजपूत म्हणाले की, मी मोबाइल बंद करून ठेवला होता. मी अंबादास दानवे यांच्यासोबत आहे. मी वर्षावरच आहे.