आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे गट-शिवसेना नेत्यांचा एकाच विमानातून प्रवास:दसरा मेळाव्यासाठी मुंबईला जाताना विमानात पडली गाठ!

औरंगाबाद6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दसरा मेळाव्यासाठी शिवसेना आणि शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात असून दोन्ही गटाचे नेते कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. विविध वाहनांसह विमानातूनही दोन्ही गटाचे नेते कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. यातच औरंगाबाद-मुंबई विमानात दोन्ही गटाचे नेते एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले.
दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांचा एकाच विमानातून प्रवास
बुधवारी औरंगाबाद-मुंबई विमानात शिवसेना आणि शिंदे गटाचे नेते एकत्र आल्याचे चित्र बघायला मिळाले. औरंगाबाद-मुंबई विमानातील एक व्हिडिओ समोर आला आहे. यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे, मंत्री संदिपान भूमरेंसह दोन्ही गटाचे नेते कार्यकर्ते दिसतात.
कार्यकर्ते मुंबईला रवाना
दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात नेते, कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी शिंदे गटावर मेळाव्यासाठी पैसे देऊन माणसे नेण्याचा आरोप केला आहे. प्रत्येकी एक हजार रुपये देऊन शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी माणसे नेली जात असल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी केला आहे. त्यांनी कितीही गर्दी जमवली तरी पैसे देऊन गर्दी जमवण्यात काहीही अर्थ नाही असे खैरेंनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...