आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे जून्या वादातून एका सत्तर वर्षीय व्यक्तीचा गळ्यावर वार करून खून झाल्याची घटना घडली असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. १०) गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक येथे सुमारे दोन वर्षापुर्वी कैलास शिंदे यांचा खून झाला होता. या प्रकरणातून शिंदे कुटूंबिय व कवडे कुटुंबिय यांच्यात वाद सुरु होता. त्यामुळे या दोन कुटुंबांमधे धुसफूस सुरुच होती. बुधवारी (ता. ९) सकाळी नामदेव खंडोजी कवडे (७०) हे बटईने केलेल्या शेतात कामासाठी गेले होते. दुपारी चार वाजता गावातील अमोल कैलास शिंदे, मच्छींद्र झनकराव शिंदे, प्रदिप झनकराव शिंदे, महादेव शिंदे, भुजंग शिंदे (सर्व रा. दाताडा बुद्रुक) व नारायण थिटे (रा. हत्ता) हे शेतात केले. त्या ठिकाणी पुन्हा वाद झाला. या वादात नामदेव कवडे यांच्या पोटात व गळ्यावर चाकूने वार करण्यात आले त्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या भांडणामधे नितीन विश्वनाथ कवडे यांनाही काठ्याने मारहाण करून जखमी करण्यात आले. नितीन कवडे हे जखमी अवस्थेत रुग्णालयात जात असतांना त्यांना शिवीगाळ करण्यात आली.
दरम्यान, दुपारी चार वाजता घडलेला प्रकार सायंकाळी गावात माहिती झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपाधिक्षक रामेश्वर वैंजने, डॉ. अश्विनी जगताप, सेनगावचे पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर, उपनिरीक्षक अभय माकणे, जमादार अनिल भारती यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात नितीन कवडे यांच्या तक्रारीवरून वरील सहा जणांवर सेनगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक ठाकूर पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.